सर्वश्रेष्ठ पु ल देशपांडे यांचे सुविचार – Pu La Deshpande Quotes Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला पु ल देशपांडे( Pu La Deshpande) यांचे सुविचार वाचायला मिळतील…
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.
📌 Quote (1)
✍️
शेवटी काय हो,
आपण पत्त्याच्या नावाचे धनी,
मजकुराचा मालक निराळाच.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (2)
✍️
“कुणीसं म्हटलयं – कसा मी ? कसा मी ?
जसा मी तसा मी असा मी असामी!…
खर सांगू का?
हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही.
मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय
तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे.
जगात काय म्हटलयं यापेक्षा
कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे
हे मला कळून चुकलंय.”
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (3)
✍️
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य,
चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,
खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
– पु ल देशपांडे
👌
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
✍️
झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही.
माझीच नव्हे, कुणाचीच नाही!
मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय?
हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो.
आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते.
प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते.
विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (5)
✍️
परिस्थिति हा
अश्रूंचा कारखाना आहे!.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (6)
✍️
प्रयास हा
प्रतिभेचा प्राणवायू आहे
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (7)
✍️
जगात काय बोलत आहात
ह्यापेक्षा कोण बोलत आहात
ह्याला जास्त महत्त्व आहे.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (8)
✍️
माणसाचे “केस गेलेले” असले
तरी चालतील….
पण….
माणुस हा “गेलेली केस”
असु नये……
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (9)
✍️
जाळायला काही नसलं की
पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (10)
✍️
माणसाला माणूस
जोडत गेलं पाहिजे…
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (11)
✍️
आयुष्य फार सुंदर आहे…
ते फक्त चांगल्या विचारांनी
जगता आलं पाहिजे…
– पु ल देशपांडे
👌
Pu La Deshpande Quotes Marathi
📌 Quote (12)
✍️
खर्च झाल्याचं दु:ख नसतं,
हिशोब लागला नाही की त्रास होतो.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (13)
✍️
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणसं.
या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (14)
✍️
माणूस अपयशाला भीत नाही.
अपयशाचं खापर फोडायला
काहीच मिळालं नाही तर?
याची त्याला भिती वाटते.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (15)
✍️
आपलाही कोणाला
कंटाळा येऊ शकतो ही
जाणीव फार भयप्रद आहे.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (16)
✍️
रातकिडा कर्कश ओरडतो
यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो
कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (17)
✍️
खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की
त्याचे सर्टिफिकेट होते.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (18)
✍️
बोलायला कुणीच नसणं
यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं
ही शोकांतिका जास्त भयाण.
– पु ल देशपांडे
👌
Pu La Deshpande Quotes Marathi
📌 Quote (19)
✍️
सगळे वार परतवता येतील पण
अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (20)
✍️
कोणत्याही सुखाच्या क्षणी
आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (21)
✍️
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो.
पण तुळस वृंदावनातच राहते.
तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
– पु ल देशपांडे
👌
📌 Quote (22)
✍️
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
– पु ल देशपांडे
👌